Home » राज्य » प्रशासकीय » कराड ते चिपळूण अवजड वाहनांना शुक्रवारपर्यंत बंदी

कराड ते चिपळूण अवजड वाहनांना शुक्रवारपर्यंत बंदी

कराड ते चिपळूण अवजड वाहनांना शुक्रवारपर्यंत बंदी

कराड -दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड-चिपळूण मार्गावरून शुक्रवारपर्यंत (दि. २७) सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार असून, वाहतूक मार्गातील बदलांची नोंद घेऊन सर्वांनी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे. 

गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणी अतिवृष्टीने १६ जून रोजी पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून हा रस्ता हलक्या वाहनांना खुला करण्यात आला. मात्र, पावसाचे वाढलेले प्रमाण व साचत असेलल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने येथून जड वाहने सोडण्यात आली नाहीत.

या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी २७ जूनपर्यंत कालावधी लागणार असल्याने हा रस्ता २७ जून रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे वाहतुकीत ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतूक मार्गातील बदलांची नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले “आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही

Live Cricket