Home » राज्य » प्रशासकीय » कराड ते चिपळूण अवजड वाहनांना शुक्रवारपर्यंत बंदी

कराड ते चिपळूण अवजड वाहनांना शुक्रवारपर्यंत बंदी

कराड ते चिपळूण अवजड वाहनांना शुक्रवारपर्यंत बंदी

कराड -दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड-चिपळूण मार्गावरून शुक्रवारपर्यंत (दि. २७) सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार असून, वाहतूक मार्गातील बदलांची नोंद घेऊन सर्वांनी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे. 

गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणी अतिवृष्टीने १६ जून रोजी पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून हा रस्ता हलक्या वाहनांना खुला करण्यात आला. मात्र, पावसाचे वाढलेले प्रमाण व साचत असेलल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने येथून जड वाहने सोडण्यात आली नाहीत.

या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी २७ जूनपर्यंत कालावधी लागणार असल्याने हा रस्ता २७ जून रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे वाहतुकीत ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतूक मार्गातील बदलांची नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ

Live Cricket