Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » कॉमर्स मधल्या करिअर संधी सीए आनंद कासट यांचा विद्यार्थी व पालकांसाठी मोफत सेमिनार

कॉमर्स मधल्या करिअर संधी सीए आनंद कासट यांचा विद्यार्थी व पालकांसाठी मोफत सेमिनार

कॉमर्स मधल्या करिअर संधी सीए आनंद कासट यांचा विद्यार्थी व पालकांसाठी मोफत सेमिनार

सातारा – आजच्या गतिशील अर्थव्यवस्थेत वाणिज्य कॉमर्स हा महत्त्वाचा घटक बनला आहे. दहावीपर्यंत वाणिज्य विषयांची फारशी तोंड ओळख नसल्याने ती निवडताना सुरुवातीला गोंधळ निर्माण होतो. वाणिज्य शाखेतील करिअर संधीबद्दल योग्य मार्गदर्शन मिळाल्याने  अनेक विद्यार्थी यशस्वीपणे आपले करिअर आकारास आणू शकतात.

कॉमर्समधील करिअरच्या संधी विषयी सीए आनंद कासट कॉमर्स का महाकुंभ या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी मोफत मार्गदर्शन करणार आहेत.वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण करिअर पर्याय वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आणि त्यानंतर उपलब्ध होणार्‍या करिअर संधींचा वेध घेणे महत्त्वाचे असते. जगात सर्वत्र आर्थिक घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडत असतात किंबहुना बहुतेक घडामोडींचे केंद्र हे अर्थकारणच असते. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राची निवड ही या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना व्यापार, व्यवसाय, बाजारातील चढउतार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, सरकारची वित्तीय धोरणे, औद्योगिक धोरण, शेअर मार्केट आदी बाबींचे ज्ञान प्राप्त होत जाते. या दरम्यान संंधित विद्यार्थ्यांचा वित्त, व्यवसाय, प्रशासन, लेखा, ई-कॉमर्स, विक्री, विपणन, वितरण आदी विषयांचा अभ्यास होत असतो. बारावीनंतर वित्त, विमा, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, परदेशी व्यापार, स्टॉक ब्रोकिंग अ‍ॅण्ड इव्हेन्स्टमेंट अ‍ॅनॅलिस्ट यांसारखे करिअर करता येते.

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना ‘कॉमर्स का महाकुंभ ‘या मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनार च्या माद्यमातून एकेज अकॅडमीचे संस्थापक आनंद कासट मार्गदर्शन करणार आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक सीए घडविण्याचे काम एकेज अकॅडमी करत आहे.रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी शाहू कला मंदिर सातारा येथे सकाळी साडे दहा वाजता सेमिनार विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी असणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

Post Views: 41 धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन  आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा

Live Cricket