दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेचा नलगे कुटुंबाला लाभ- शाम झोरे शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राजवाडा येथील बोधी( पिंपळ) वृक्ष रिक्षा चालकांना देई गारवा…

राजवाडा येथील बोधी( पिंपळ) वृक्ष रिक्षा चालकांना देई गारवा… 

डौलदार वृक्षाच्या छायेने रिक्षाचालक सुखावले..

राजवाडा येथील बोधी( पिंपळ) वृक्ष रिक्षा चालकांना देई गारवा… 

सातारा – राजवाडा( अजिंक्य रिक्षा स्टॉप) येथून शहराच्या विविध भागात प्रवाशांना घेऊन जाणारे रिक्षा चालक जेव्हा थकून भागून पुन्हा राजवाडा रिक्षा स्टॉप मध्ये येतात तेव्हा बहरलेले डौलदार बोधी वृक्ष च्या छायेत ते सुखावले जातात येथील हे बोधी वृक्ष रिक्षा चालकांसाठी एक गारव्याचे ठिकाणही बनले आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने घायाळ झालेल्या मानवी जीवनाला अखेर वृक्ष मायेची सावली देत असतात वृक्षवल्लीमुळे जीवसृष्टीचे खरे अस्तित्व टिकून आहे म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा आजच्या काळाची गरज आहे संसाराचा गाडा ओढताना वृक्ष आपल्या जीवनाला गारवा देऊन सुखकर करतात असाच काहीसा अनुभव राजवाडा रिक्षा स्टाॅप येथील रिक्षा चालकांना येत आहे उन्हाळ्यात हा बोधीवृक्ष बहलरलेला असून त्याची सावली ही रिक्षा चालकांसाठी एक वरदान ठरत आहे.प्रवाशांच्या प्रतीक्षेत तासन तास उभे असणाऱ्या रिक्षा चालकांच्या रिक्षांनाही सावली लाभत आहे राजवाडा येथील रिक्षा स्टाॅप असंख्य रिक्षाचालक आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा लावतात त्यांना उन्हाळ्यात या वृक्षामुळे उष्णतेचा झळा बसत नाहीत परिणामी बहरलेले वृक्ष त्यांच्यासाठी खूप अनमोल आहे या ठिकाणी जवळपास 300 ते 400 रिक्षा चालक रोज ये जा करत असतात त्यांच्यासाठी हा बहरलेला वृक्ष एक मायेची सावली देत आहे.

 – उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने रिक्षा चालकांना याचा फटका अधिक जाणवतो भर उन्हात रिक्षा वाहतूक करताना जीवाची लाही लाही होती अशावेळी बहरलेल्या वृक्षांच्या छायाने हायसे वाटते वृक्ष देई मायेची सावली हे तितकेच खरे आहे… कोट – निसर्गातील समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे जीवसृष्टीचे अस्तित्व यावरच अवलंबून आहे ऑक्सिजन रुपी जीवन दान देणाऱ्या वृक्षांची जपणूक हे प्रत्येकानचे कर्तव्य म्हणून पार पडले पाहिजे काही वृक्षद्रोही स्वतःच्या स्वार्थासाठी झाडे तोडत आहेत परंतु वृक्ष आपणाला निरपेक्ष भावनेने मायेची सावली देत असतात राजवाडा येथील डौलदार पणे बहरलेले वृक्षाचे जतन वृक्षप्रेमींनी केल्यामुळेच आज त्यांना मायेची सावली मिळत आहे ..

                        श्रीरंग काटेकर (वृक्षप्रेमी सातारा)

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम सातारा-(प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेचा २४

Live Cricket