Post Views: 348
सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक जाहीर ,5 एप्रिल रोजी मतदान
कराड प्रतिनिधी : सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.निवडणुकीसाठी 5 एप्रिल ला मतदान व 6 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
21 जागांसाठी ही निवडणूक होत असून विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी निवडणूक रणशिंग फुंकल्यामुळे ही निवडणूक चुरशीशी होणार आहे.
कारखाना निवडणुकीसाठी गुरुवार 27 फेब्रुवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून 5 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच 6 मार्चला छाननी होणार असून 7 मार्च ते 21 मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. तर 5 एप्रिल रोजी मतदान होणार असून 6 एप्रिल ला मतमोजणी होणार आहे.
