साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाविकास आघाडीचे उमेदवार आ.पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा

महाविकास आघाडीचे उमेदवार आ.पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा

महाविकास आघाडीचे उमेदवार आ.पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा

कराड, प्रतिनिधी : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ.पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले. मनोज जरांगे – पाटील यांच्या आदेशावरून सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मराठा समाजाने पाठिंबा दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे – पाटील, सुरज जाधव, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष युवराज कुराडे – पाटील, कराड शहराध्यक्ष संदीप काळे, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय शिंदे, अमर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मराठा समाजाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मनोज जरांगे – पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला. यावेळेस विधानसभेत आ. चव्हाण यांनी आरक्षणाची आपली भूमिका ठामपणे मांडली. आरक्षणासाठी त्यांचा आग्रह कायम आहे. त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत मराठा समाजाच्या पदाधिकऱ्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मराठा महासंघाचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार जनार्दन देसाई (कार्वे ), प्रकाश पाटील (आटके ), रवींद्र यादव (मलकापूर ), ऋषिकेश जाधव (ओंड ) यांनीही उपस्थित राहून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket