साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सार्वजनिक जागेत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी : भालेघर ग्रामस्थ आक्रमक

सार्वजनिक जागेत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी : भालेघर ग्रामस्थ आक्रमक

सार्वजनिक जागेत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी : भालेघर ग्रामस्थ आक्रमक ; तहसीलदारांकडे घेतली धाव

पांचगणी : डोंगरमाथ्यावर वसलेल्या जावली तालुक्यातील दुर्गम अशा भालेघर गावाची विकासाकडे दमदार वाटचाल चालू आहे. सार्वजनिक विकास कामात ‘रामनामांचे ‘ नाव घेत अनधिकृत बांधकाम करून ‘ दत्त ‘ म्हणून उभे ठाकत अडथळा निर्माण करणाऱ्या हेकेखोर अडेलतट्टुवर कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाला संबंधित कोलदांडा दाखवत असून त्यांचेवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जाणार आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की दिवदेव – मार्ली – भालेघर दुर्गम असणाऱ्या डोंगर माथ्यावरील गावांना जोडणारा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधला आहे. परंतु या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गटरचे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे आपल्याच गावच्या विकासाला आपलेच लोक विरोध करीत असल्याने गावात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. 

याबाबत ग्रामपंचायत, सरपंच यांनी सांगून सुध्धा सार्वजनिक ठिकाणी या व्यक्तीचे अनधिकृत बांधकाम बिनधास्तपणे चालू आहे. याबाबत ग्रामपंचायतीने हतबल होऊन जावळी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हंटले आहे की दिवदेव – मार्ली – भालेघर – आखाडे रस्त्याचे रुंदीकरण काम नुकतेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जावली (मेढा) यांनी केले असून मौजे भालेघर हे गाव डोंगरावर वसलेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. तरी सदर रस्त्यालगत असणारे नाले दत्तात्रय रामचंद्र पवार यांनी त्यांच्या घरा लगत सिमेटपाईप टाकूण बांधकाम करुन पाणी वाहण्यास अडथळा केला आहे.

 त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. लगतच्या घरांमध्ये पावसाचे पाणी जात आहे. सदरचे सांडपाणी सदर नाल्यांमधून पुढे वाहून जाणे आवश्यक आहे. परंतु ते तुंबून राहिल्याने या परिसरात रोगराईचा प्रश्न उद्भवणार आहे. हा धोका ओळखून सदरचे नाले उकरून सांडपाणी सुरळीत करून द्यावे व होणारी गैरसोय दूर करावी. त्याचबरोबर संबंधित नाला बंद करणारे खातेदार यांच्यावर आपणा मार्फत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती या निवेदनात केली आहे.

 शासकीय निधीचा वापर चालू असताना जर अशा गाव टग्यानी जर या कामाला अडथळा लावण्याचे काम केले तर या निधीचा विनियोग होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना याचा फटका बसणार आहे. गावापेक्षा राव मोठा नाही त्यामुळे अशा अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

श्रीहरी गोळे, भाजप तालुका अध्यक्ष

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket