साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अजिंक्यतारा गणेश मंडळाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा झाला सदाबहार आणि नेटका

अजिंक्यतारा गणेश मंडळाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा झाला सदाबहार आणि नेटका

सातारच्या मिठालालच्या पालक पुरीची ‘मेजवानी ‘..

पुण्याच्या लावण्यावती ‘अप्सरेचा ‘ ठसका..!

अजिंक्यतारा गणेश मंडळाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा झाला सदाबहार आणि नेटका

भुईंज :- (महेंद्रआबा जाधवराव) अजिंक्यतारा साखर कारखाना कामगार गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमानंतर प्रसिद्ध केटरर्स मिठालाल यांच्या स्नेहभोजन मेजवानीचा मनसोक्त आस्वाद तर पुण्याची अप्सरा सिनेतारीका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांच्या सदाबहार कार्यक्रमचा आनंद अधिकारी – कामगार यांनी लुटाला.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर याहीवर्षी मा.आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) व मा. श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले, (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते, चेअरमन मा.श्री. यशवंत साळुंखे अध्यक्ष व मा. संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

 दरम्यान शुक्रवारी श्री. सत्यनारायणाची महापूजा व महिलासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सातारा येथील प्रसिद्ध केटररर्स मिठालाल यांच्या पालक पुरीची मेजवानी व कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते साहेब यांनी पुरस्कृत केलेल्या गोड लापसीवर सर्वांनी ताव मारला.

दुपारी सिनेतारीका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांचा लक्ष्मी प्रोडक्शन पुणे निर्मित अप्सरा आली, (सुत्रधार गिरीज महाजन) या बहारदार कार्यक्रमाचा शुभारंभ 

कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, कारखान्याचे संचालक भास्करराव घोरपडे व मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव,कामगार युनियनचे अध्यक्ष कृष्णात धनवे, पोळ साहेब, धायगुडे साहेब, दिग्विजय पाटील साहेब, दिनेश चव्हाण साहेब, सयाजीराव पाटील, राजाराम कणसे, संजीवन कदम, प्रमोद कुंभार साहेब, माजी कामगार संचालक नितीन भोसले तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित झाला. लावण्यवती अर्चना सावंत व सहकलाकारांनी सादर केलेल्या लावण्या व सदाबहार गाण्यावरील नृत्याने उपस्थिताची मने जिंकली. तर कारखान्याचे गोडाऊन किपर पवार साहेब यांनी गायलेल्या गीतांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket