मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » देश » दिशाच्या १७ विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था आयआयटी मध्ये निवड

दिशाच्या १७ विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था आयआयटी मध्ये निवड

दिशाच्या १७ विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था आयआयटी मध्ये निवड

जेईई ॲडव्हान्स परीक्षा २०२४ च्या निकालात दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकुण ४८ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची निवड भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT मध्ये झाली आहे. ही टक्केवारी जवळपास ३५ टक्के आहे. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आणि भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला हातभार लावण्यासाठी कुशल कार्यबल विकसित करण्याच्या उद्देशाने शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी IITs या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था गणल्या जात असल्याने दिशाच्या विद्यार्थ्यांची झालेली निवड ही महत्वपूर्ण आहे. 

पुर्वा पवार, आर्यन राज, शंतनू मोरे, यश निकम, यशराज साळुंखे, अर्थव अडसुळ, हर्ष राज, रोशन कुमार, मृणाल भारती, श्रेयस कातुळे, अनुराग कुमार, कौशल राज, यजुवेंद्र रणावरे, सृजल सामंत, अर्थव चौधरी, धमदिक्षा जाधव, गौरव कुमार या १७ विद्यार्थ्यांची निवड आयआयटीमध्ये झालेली आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढत दिशा ॲकॅडमीने आनंदाची आतीषबाजी केली आहे.

या निवडीबद्दल बोलताना दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम म्हणाले; चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याने या विद्यार्थ्यांचा भविष्यातील मार्ग अधिक सोपा होणार आहे, भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी अनेक गोष्टींचे ज्ञान या संस्थामध्ये मिळेलच शिवाय भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याबरोबरच चांगला व्यक्ती घडवण्यातही IIT संस्थेचा मोलाचा वाटा असणार आहे. ११वी १२ वीची तयारी करताना दिशाने करून घेतलेली स्पर्धा परीक्षेची तयारी या प्रवासात मोलाची ठरली आहे. आमच्या तज्ञ शिक्षकांची शिकवण्यातील तळमळ आणि विद्यार्थ्यांची मेहनत खऱ्या अर्थाने विजयी झाली आहे. 

आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची, कौशल्ये विकसित करण्याच्या संधीचा पुरेपुर फायदा दिशाचे विद्यार्थी करून घेतील असा विश्वास व्यक्त करत, दिशाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रा. रूपाली कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

दिशा ॲकॅडमीतील प्राध्यापकांप्रमाणेच आयआयटी देखील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करत संशोधताही सर्वोच्च स्थानी नेतील. भविष्यात आमचे विद्यार्थी उत्तम करिअर घडवतील असे सांगत, दिशाचे शिक्षण विभाग प्रमुख सतीश मौर्य यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दिशा ॲकॅडमीतील शिक्षक, कर्मचारी, पालक व समाजातील विविध स्तरातून आयआयटी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket