मौजे हरळी, ता. खंडाळा गावचे हद्दित घरफोडी करणारे अज्ञात चोरटे निष्पन्न करून चोरीस गेलेला माल हस्तगत तसेच जेरूरी, फुरसुंगी पोलीस ठाणे कडील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई
खंडाळा पोलीस ठाणे हद्दित दिनांक दिनांक ७.११.२०२६ रोजी दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास तसेच दिनांक १२.११.२०२६ रोजीचे १७.०० ते दिनांक १३.११.२०२६ रोजीचे सकाळी ८.०० वाचे पर्यत मौजे हरळी ता खंडाळा जि सातारा येथील सौरभ राजेंद्र शिंदे वय २६ राहणार हरळी ताखंडाळा जि सातारा यांचे पोल्ट्री फार्म येथून वेळोवेळी त्यांचे कंम्पाऊडची तार तोडून आत मध्ये प्रवेश करून फिर्यादी यांचे १५० मिटर कॉपर केबल, औषध फवारणीचा एस टी पी पंप, १०० फुटाचे दोन पाण्याचे पाईप, २ पक्कड, पाने, चटई इत्यादी साहीत्य चोरी करून घेवून गेले म्हणून गुरनं २२६/२०२६ बी एन एस ३०५(अ), ३३१ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास केला असता गुन्हयात २ महीला व २ पुरूष आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून गोपनीय सुत्राचे आधारे आरोपी माहीती काढून संशयीतांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल १) बोअरवेल मधील ९० मिटर केबल, २) औषध फवारणीचा एस टी पी पंप, ३) १०० फुटाचे दोन पाण्याचे पाईप तसेच दोन मोटार सायकल हस्तगत केलेल्या आहेत. सदर मोटार सायकल १) होडा स्प्लेंडर मोटार सायकल व स्प्लेंडर मोटार सायकल याबाबत चौकशी केली असता जेजुरी पोलीस स्टेशन व फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केले असले बाबत निष्पन्न झालेले आहे.आरोपी
१) उमेश गोपाळ पाटील वय ३४ राहणार कोथळेवाडी ता वाई जि सातारा
२) साक्षी संजय तांगडे वय २१ रा केदारेश्वर मंदिर शिरवळ
३) तेजल करण पवार वय २० वर्षे रा पंढरपुर फाटा शिरवळ
४) राहुल रावसो जाधव वय २१ रा वार्ड नंबर १ निरा ता पुरंदर जि पुणे
मा.श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक साो सातारा, श्री. सुरज गुरव मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोो सातारा, श्री. धन्यकुमार गोडसे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो फलटण भाग फलटण यांनी घरफोडी, चोरीचे गुन्हे कसोसीने प्रयत्न करून उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जे. जगताप, श्रीम. मपोउनि एस. एस. माने, पोहवा ४९७ नितीन महांगरे, पोहवा २६३ दत्ता दिघे, पोहवा ११८३ सी. एस. धापते, पोहवा ५६२ एस.बी.जाधव यांनी कारवाईत भाग घेतला आहे.



