Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाचगणीत संविधान दिन उत्साहात साजरा; भीम आधारस्तंभ फाउंडेशनतर्फे संविधान पुस्तकांचे वाटप

पाचगणीत संविधान दिन उत्साहात साजरा; भीम आधारस्तंभ फाउंडेशनतर्फे संविधान पुस्तकांचे वाटप

पाचगणीत संविधान दिन उत्साहात साजरा; भीम आधारस्तंभ फाउंडेशनतर्फे संविधान पुस्तकांचे वाटप

पाचगणी : भारतीय संविधान दिनानिमित्त पाचगणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. यावेळी महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

या निमित्ताने भीम आधारस्तंभ फाउंडेशनच्या वतीने भीमनगर, सिद्धार्थनगर आणि आंबेडकर कॉलनी येथील नागरिकांना संविधान पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच संविधान चौकात पुष्पहार अर्पण करून उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि उपस्थितांना मिठाई वाटप करून संविधान दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील बगाडे, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष नितीन वन्ने, भीम आधारस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गुरुजी मोरे, पाचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, घाटजाई विकास पॅनलचे अध्यक्ष शेखर भाऊ कासुर्डे, नगरसेवक प्रवीण बोधे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक कदम, समता सैनिक दलाचे कमांडर युनिट अध्यक्ष महेंद्र सोनवणे, बौद्धाचार्य प्रकाश खरात, अरुण घाडगे गुरुजी, उत्तम कांबळे, संजय वन्ने, विकी परिहार, नितीन कांबळे, किसन गंगावणे, पिंकेश सपकाळ, संविधान जनजागृतीसाठी कार्यरत किशोर कांबळे, अशोक(दादा )कांबळे, बाळू गंगावणे, नारायण बिरामणे, नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तसेच पाचगणी शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचगणीत संविधान दिन उत्साहात साजरा; भीम आधारस्तंभ फाउंडेशनतर्फे संविधान पुस्तकांचे वाटप

पाचगणीत संविधान दिन उत्साहात साजरा; भीम आधारस्तंभ फाउंडेशनतर्फे संविधान पुस्तकांचे वाटप पाचगणी : भारतीय संविधान दिनानिमित्त पाचगणी येथील डॉ. बाबासाहेब

Live Cricket