Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » तापोळा रोडचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर रस्ता चार फुटांनी रुंद होणार-नगराध्यक्ष सुनील शिंदे

तापोळा रोडचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर रस्ता चार फुटांनी रुंद होणार-नगराध्यक्ष सुनील शिंदे 

तापोळा रोडचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर रस्ता चार फुटांनी रुंद होणार-नगराध्यक्ष सुनील शिंदे 

महाबळेश्वर : माखरी हायस्कूलनजीकच्या तापोळा रोडच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याची भावना वाहनधारक आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी नागरिकांना वस्तुस्थिती स्पष्ट करत गैरसोय तात्पुरती असल्याचे सांगितले.

रस्त्यालगत नव्याने साईड गटर बांधण्यात आल्याने सध्या रस्त्याची रुंदी कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून अंतिम टप्प्यात साईड गटराच्या उंचीपर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर रस्ता सध्याच्या तुलनेत जवळपास चार फुटांनी रुंद होणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

येत्या एक ते दीड महिन्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नगरपरिषदेचे उद्दिष्ट आहे. कामादरम्यान नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत शहराच्या विकासासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्ता निकषात सुधारणा – आदिती तटकरे

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्ता निकषात सुधारणा – आदिती तटकरे मुंबई- अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत

Live Cricket