ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » Uncategorized » ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

नेर : मौजे नेर (ता. खटाव) येथील श्री. गणेश चव्हाण यांच्या ऊसाच्या शेतात चार कोल्ह्यांची पिल्ले आढळून आली. याबाबत १० नोव्हेंबर रोजी माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पिल्लांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. वनविभागाच्या सतर्कतेमुळे रात्री आई कोल्हीने चारही पिल्लांना सुखरूपपणे आपल्या सोबत नेले.

ऊसाच्या शेतात चार कोल्ह्यांची पिल्ले असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वनसेवकांनी परिस्थितीची पाहणी करून ऊसतोड कामगारांना मानव-वन्यजीव संघर्ष तसेच बिबट्यापासून घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. पिल्ले आढळलेल्या ठिकाणची स्वच्छता करून त्यांना सुरक्षितपणे ठेवण्यात आले.

सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व ऊसतोड कामगार शेतातून बाहेर पडेपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी थांबून होते. त्यानंतर पिल्लांना कोणताही धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात आली.

११ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता पुन्हा घटनास्थळी पाहणी केली असता चारही पिल्ले तेथे आढळली नाहीत. मात्र, परिसरात आई कोल्हीच्या पायांचे ठसे दिसून आले. त्यावरून आई कोल्हीने रात्री येऊन आपल्या चारही पिल्लांना सुखरूपपणे दुसरीकडे नेल्याचे स्पष्ट झाले.

या संपूर्ण कार्यवाहीत वनसेवक युवराज मदने, आपा मोहिते, प्रशांत मदने आणि संतोष जाधव यांनी सहभाग घेतला. वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहता यावे, यासाठी वनविभागाने केलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket