यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार मोटरसायकल चोरी करणारे दोन विधिसंघर्ष बालक ताब्यात :- एकुण 5,25,000/- रुपये किंमतीच्या 7 मोटारसायकल जप्त पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन वेळू येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी -भूजल पातळी वाढण्यास होणार मदत
Home » राज्य » शिक्षण » साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर

साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर

साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर

 गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंब मध्ये अन्वेषणम नियतकालिकेचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

लिंब-साहित्य निर्मिती मध्ये संस्कृती व संस्काराचे सामर्थ्य सामविलेले आहे. त्यामुळे या संस्कारातून निर्माण होणारी साहित्यिक रचना विद्यार्थ्यांच्या भविष्य काळातील उत्कर्षाला पूरक ठरते असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मधील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, नव संशोधन,कला, क्रीडा यावर आधारित महाविद्यालयाचा वार्षिक आढावा संदर्भात अन्वेषणम नियतकालिकेचे प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर, विभाग प्रमुख डॉ. भूषण पवार, डॉ. माधुरी मोहिते, मॅगझिन इन्चार्ज प्रा. नूतन गवांदे, प्रा. कीर्ती माने, प्रा. रोहन खुटाळे,प्रा. गौरी इथापे, रजिस्ट्रार निलेश पाटील आदि प्रमुख उपस्थित होते. 

प्रारंभी अन्वेषणम नियतकालिकेच्या समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मुखपृष्ठ व आतील लेआउट याचे सुरेख संगम या नियतकालिकेमधून सादर केल्याने ते आकर्षक बनले आहे. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी अन्वेषणम नियतकालिके साठी खूप परिश्रम घेतले आहेत. महाविद्यालयातील सर्वच घडामोडीचा अचूक वेध घेताना सर्वसमावेशक साहित्यरचनेला प्राधान्यक्रम दिला आहे. अन्वेषणम म्हणजे ज्ञानाचा शोध हा भविष्यातील उज्वल परिवर्तनाचा ध्यास हा मंत्र घेऊनच या नियतकालिकेची मांडणी केलेली आहे. 

विद्यार्थी पालक वर्गातून या नियतकालिकेचे स्वागत करण्यात आले आहे 

अन्वेषणम नियतकालिकेसाठी प्रा. नूतन गवांदे व त्यांच्या कमिटीने घेतलेल्या परिश्रमाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे अनेकांनी भावना व्यक्त केल्या. 

 अन्वेषणम नियतकालके मधून वैचारिक प्रगल्भतेचा अनोखा अविष्कार अनुभवाला मिळत आहे. शब्दांची मांडणी. व शब्दरूपी साहित्याचे केलेले गुंफण यामुळे हे नियतकालिक वाचनीय बनले आहे. विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, विज्ञान,संशोधन, कल्पकता या गुणांना यामुळे संधी मिळत आहे.

मदनराव जगताप अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा. 

प्रास्ताविक व आभार.. प्रा नूतन गवांदे यांनी केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर सातारा : बचतीची सवय ही केवळ आर्थिक सुरक्षिततेचा पाया नसून, शाश्वत

सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार

पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

Live Cricket