यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार मोटरसायकल चोरी करणारे दोन विधिसंघर्ष बालक ताब्यात :- एकुण 5,25,000/- रुपये किंमतीच्या 7 मोटारसायकल जप्त पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन वेळू येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी -भूजल पातळी वाढण्यास होणार मदत
Home » Uncategorized » क्राईम डायरी » मोटरसायकल चोरी करणारे दोन विधिसंघर्ष बालक ताब्यात :- एकुण 5,25,000/- रुपये किंमतीच्या 7 मोटारसायकल जप्त

मोटरसायकल चोरी करणारे दोन विधिसंघर्ष बालक ताब्यात :- एकुण 5,25,000/- रुपये किंमतीच्या 7 मोटारसायकल जप्त

मोटरसायकल चोरी करणारे दोन विधिसंघर्ष बालक ताब्यात :- एकुण 5,25,000/- रुपये किंमतीच्या 7 मोटारसायकल जप्त

सातारा -मा.पोलीस अधिक्षक साो, निखील पिंगळे, मा.अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे यांनी सातारा शहरातून चोरीस जाणारे मोटारसायकल चोरटयाचा शोध घेणेबाबत डी.बी.पथकास सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सातारा शहर डी.बी. पथकाने रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरटयांचे हालचालीवर लक्ष ठेवून होते. दि.29/10/2026 रोजी एका युवकाने गोडोली येथील पालवी चौक येथून एक मोटारसायकल चोरी केली असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. सदर आरोपी बाबत माहिती घेत असताना तांत्रिक माहितीचे आधारे संशयित आरोपीचे नाव समजून आले. सातारा शहर डी.बी. चे एक पथक तीन दिवसापासून त्याचे मागावार होते. सदरचे संशयीत इसमाचे गोपनीय माहितीचे व तांत्रिक माहितीच्या आधारे दोन संशयीत इसमांना सातारा शहरातील मोळाचा ओढा येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली असता ते विधीसंघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे पालकांसमक्ष गुन्ह्राचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनीे सातारा शहर परिसरातील विविध ठिकाणावरुन चार, सातारा तालुका परिसर येथून एक मोटारसायकल तसेच कोरेगाव रेल्वे स्टेशन पार्किग मधुन एक मोटार सायकल चोरी केलेचे कबूल करुन सदर चोरी केलेल्या मोटार सायकल या विक्री करण्याचे उद्ेशाने लपवून ठेवलेबाबत सांगितले. तसेच त्यांनी सदरच्या मोटारसायकल ठेवलेले ठिकाण समक्ष दाखविले सदर ठिकाणी एकूण 6 मोटार सायकल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटारसायकल मिळून आल्याने त्या पोलीसांनी जप्त केलेल्या आहेत. सदर कारवाई मध्ये एकूण 5 गुन्हे उघडकीस आलेले असून एका मोटार सायकलचे चॅसी व इंजिन नंबर खोडल्याने सदरबाबत अधिक तपास चालू आहे.  

 “नागरिकांना आव्हान करण्यात येते की सध्या शहरात तसेच परिसरामध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. बहुतांश घटनांमध्ये निष्काळजीपणा आणि पुरेशा सुरक्षिततेचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, आपले दुचाकी वाहन नेहमी अधिकृत व सुरक्षित पार्किंगमध्ये उभे करावे. रस्त्यावर, निर्जन ठिकाणी किंवा अंधा­या गल्लीबोळात वाहने पार्क करणे टाळावे. आपली दुचाकी ही शक्यतो सीसीटीव्ही असेल त्या परिसरात पार्क करावी. आपली दुचाकी पार्क केल्यानंतर केवळ हँडल लॉकवर विसंबून न राहता डिस्क लॉक, व्हील लॉक किंवा चांगल्या दर्जाच्या चेन लॉकचा वापर करावा. नागरिकांनी तसेच आपले लॉक एका ठराविक काळानंतर बदलून घ्यावे जेणेकरुन इतर कोणत्याही चावीने आपली दुचाकी कोणी चोरून नेणार नाही.”

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साो, निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.सुधीर मोरे, पो.हवा.निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, वैभव माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, यांनी केलेली आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर सातारा : बचतीची सवय ही केवळ आर्थिक सुरक्षिततेचा पाया नसून, शाश्वत

सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार

पाचवड येथे वित्तीय समावेशन अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

Live Cricket