आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद!
Home » ठळक बातम्या » आरोग्य » आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग

फलटण: जोशी हॉस्पिटल प्रा. लि.,फलटणच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी आयोजित आपली फलटण मॅरेथॉन २०२६, रविवार दि. २५ रोजी सजाई गार्डन, फलटण येथे आयोजित करण्यात आली असून १० व्या वर्षात विविध वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. सुमारे २५०० स्पर्धक यावर्षी सहभागी होत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

फलटणच्या क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देणारा उपक्रम म्हणून आपली फलटण मॅरेथॉन लोकप्रिय होत आहे. यावर्षीच्या मॅरेथॉनच्या शुभारंभप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा देतील, त्यानंतर विविध वयोगटातील यशस्वी स्पर्धकांना प्रख्यात चित्रपट व नाट्य अभिनेते समीर धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी, सिनेमॅटोग्राफर सौ. अपर्णा धर्माधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.

सुमारे ६० बक्षिसे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.२१ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये १५० पुरुष व ५० महिला असे एकूण २००, १० कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये ३०० पुरुष व १०० महिला अशा एकूण ४००, ५ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये २५० पुरुष व १५० महिला अशा एकूण ४००, ३ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये (Fun run) ३०० पुरुष व २०० महिला अशा एकूण ५००, ३ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये (Walkethon) ६५ वर्षावरील ३०० पुरुष व २०० महिला अशा ५००, असे एकूण २००० स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

याशिवाय साधारण ७५० हून अधिक रोबोटिक (विठू रोबो) सांधेरोपण केलेल्या रुग्णांची एक आगळी वेगळी ३ कि.मी. walkethon आयोजित केली आहे, अशा प्रकारची संधेरोपण झालेल्या रुग्णांची walkethon पहिल्यांदाच होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग

आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग फलटण: जोशी हॉस्पिटल प्रा. लि.,फलटणच्या

Live Cricket