संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विवेकी पालकत्व विषयावर व्याख्यान संपन्न
Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा

महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा

महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा

महाबळेश्वर:महाबळेश्वर शहरातील पॅनोरमा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर आज, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी महाबळेश्वर गिरीस्थान परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईद्वारे रस्त्यावरील व फूटपाथवरील अतिक्रमणे हटवून हा परिसर नागरिक तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या दळणवळणासाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.

ही विशेष मोहीम महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

पॅनोरमा हॉटेल परिसरात फूटपाथ व रस्त्यांवर अस्ताव्यस्त अतिक्रमणे झाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना रहदारीसाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलत ही धडक मोहीम राबवली.

कडक कारवाईचा इशारा

*“यापुढे पॅनोरमा परिसर किंवा महाबळेश्वर शहरातील कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर अथवा फूटपाथवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कडक दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल.”*

— मुख्याधिकारी योगेश पाटील. 

आजच्या कारवाईत सदर कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख श्री. मुरलीधर धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यामध्ये वरिष्ठ लिपीक बबन जाधव,कर निरीक्षक अमित माने, वैभव पांढरे, नगररचनाकार मिलिंद गायकवाड तसेच कर विभाग, बांधकाम विभाग व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही मोहीम पूर्ण केली.

महाबळेश्वर शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी यापुढेही अशी स्वच्छता व अतिक्रमण विरोधी मोहीम सातत्याने सुरू राहील, असे नगरपरिषद प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद!

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! सातारा : सातारा जिल्हा

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket