Home » Uncategorized » पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या दृष्टीने महाबळेश्वर पोलीस ठाण्यामार्फत विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. महाबळेश्वर पोलिसांच्या हद्दीतील सर्व हॉटेल, लॉज, होम-स्टे, बंगले, रो-हाऊस आणि फार्म हाऊस चालक-मालकांसाठी “आमची सुरक्षा, आमची जबाबदारी”या उपक्रमांतर्गत एका विशेष मार्गदर्शक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

​ही महत्त्वाची बैठक शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महाबळेश्वर येथील गौतम हॉटेलच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमुख उपस्थित राहून सर्व व्यवसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

 बैठकीतील प्रमुख विषय आणि मार्गदर्शन

​पर्यटन व्यवसायाशी निगडित विविध कायदेशीर आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे:

▪️सायबर सुरक्षा व डिजिटल खबरदारी:पर्यटन क्षेत्रातील वाढते डिजिटल व्यवहार, ऑनलाइन हॉटेल बुकिंग आणि आस्थापनांच्या डिजिटल सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी, सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि खबरदारीच्या उपाययोजनांबाबत पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शन केले जाईल.

▪️*​परदेशी नागरिकांची ‘C’ फॉर्म नोंदणी:* परदेशी पर्यटकांच्या मुक्कामासंदर्भातील कायदेशीर तरतुदी, नियमांचे पालन आणि ‘C’ फॉर्म (C Form) नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया अचूक कशी पूर्ण करावी, याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.

​⚠️ *अनुपस्थित राहणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा*

​महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे *पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे* यांनी क्षेत्रातील सर्व हॉटेल, होम-स्टे व लॉज मालक-चालकांना या बैठकीस वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

​त्याचसोबत त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जे चालक किंवा मालक या बैठकीस अनुपस्थित राहतील, त्यांना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचना आणि नियमांची पूर्ण माहिती झाल्याचे गृहीत धरले जाईल. या बैठकीनंतर संबंधित आस्थापनांमध्ये नियमांचे उल्लंघन किंवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket