Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » उद्योग विश्वात झेप घेणारा युवा उद्योजक : संग्रामबापू घोरपडे

उद्योग विश्वात झेप घेणारा युवा उद्योजक : संग्रामबापू घोरपडे

उद्योग विश्वात झेप घेणारा युवा उद्योजक : संग्रामबापू घोरपडे

२ ऑक्टोबर… देश महात्मा गांधी जयंती साजरी करत असतो आणि याच दिवशी मत्त्यापूर सारख्या छोट्याशा गावात एका युवा नेतृत्वाचा जन्म झाला. जयंतीचा दिवस म्हणूनच लहानपणापासून सर्वजण प्रेमाने त्यांना बापू’ म्हणू लागले आणि आज हाच बापू हजारो युवकांच्या रोजगाराचा आधार बनला आहे.ते म्हणजे युवा उद्योजक संग्रामबापू घोरपडे.

कैलासवासी भिमरावदादा घोरपडे यांचे चिरंजीव असणाऱ्या संग्राम बापू यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून त्यांनी इंजीनियरिंग ची पदवी पूर्ण केली. पदवी हातात असताना अनेकांप्रमाणे नोकरीच्या मागे लागणे सोपे होते, पण बापूंनी वेगळा मार्ग निवडला – नोकरी मागायची नाही, नोकरी द्यायची!

शून्यातून विश्व निर्माण केले.

सुरुवात झाली सातारा एमआयडीसी मधून. प्रज्वल टूल्स’ या छोट्याशा कंपनीच्या माध्यमातून त्यांनी उद्योग विश्वात पहिले पाऊल टाकले. प्रामाणिकपणा, कष्ट आणि दूरदृष्टी या त्रिसूत्रीवर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.आज त्या छोट्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. आज संपूर्ण भारतभर त्यांच्या १६ हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. हजारो युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे, म्हणजेच हजारो कुटुंबांचा आधार ते बनले आहेत.

त्यांच्या उद्योग साम्राज्यात –खटाव माण साखर कारखाना, अटलांटा पेट्रोलियम, अटलांटा विंड पावर, अटलांटा कोल मायनिंग, मनोज कंस्ट्रक्शन, अटलांटा सोलर पावर अशा अनेक नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

मत्त्यापूरचा सुपुत्र ते यशस्वी उद्योजक

आमदार मनोजदादा घोरपडे यांचे धाकटे बंधू असणाऱ्या संग्राम बापूंनी आपल्या मोठ्या भावाच्या सामाजिक-राजकीय कार्याला उद्योगाची भक्कम जोड दिली आहे. मत्त्यापूरसारख्या छोट्या गावात, पण स्वप्नं मात्र आकाशाला गवसणी घालणारी.आजच्या तरुण पिढीसाठी संग्राम बापू हे एक प्रेरणास्थान आहे. खेडेगावात जन्म घेऊनही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर उद्योग विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

अशा या कर्तृत्ववान, मितभाषी आणि दिलदार युवा उद्योजकास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून अशीच उद्योग-सेवा घडत राहो आणि हजारो युवकांच्या आयुष्यात प्रकाश येत राहो, हीच सदिच्छा!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बापू!

गणेश जाधव-जिल्हा सरचिटणीस भाजपा

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket