मंजू इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगची ‘नजाकत’ फॅशनची पर्वणी; ३ व ४ ऑक्टोबरला राधिका संकुलात प्रदर्शन
मंजू इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग सातारा आयोजित “नजाकत” फॅशन ड्रेसेस प्रदर्शन .
सातारा प्रतिनिधी -मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा महिलांसाठी अनेक उपक्रम गेली 32 वर्ष राबवित आहे. नवरात्रीचे अवचित साधून आपल्यासमोर नजाकत फॅशन ड्रेसेस प्रदर्शन घेऊन येत आहे. प्रदर्शन दिनांक तीन व चार ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ पर्यंत राधिका संकुल राधिका रोड येथे सर्व वर्गासाठी खुले आहे.
फॅशन थीमवर आधारित प्रदर्शनात डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी स्वतः डिझाईन केलेले घागरा, चनिया चोली, वेस्टर्न ,इंडो वेस्टर्न, साडी नऊवारी साडी, ब्लाउज, वन पीस, ज्वेलरी, नवरात्री ॲक्सेसरीज आधी गोष्टीचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. रोहिणी काकडे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट या येणार आहेत. या प्रदर्शनातील ड्रेसेस हे उत्कृष्ट कारागिरी व डिझाईन या उत्कृष्ट मिलाफ आपणास पहावयास भेटणार आहे .अशा प्रकारचे प्रदर्शन साताऱ्यात पहिल्यांदाच अनुभवास मिळणार आहे .या प्रदर्शनासाठी फॅशन विद्यार्थिनी भरपूर मेहनत घेतली आहे.
या मेहनतीला सर्व सातारकर जिल्ह्यात फॅशन प्रतिनिधी भेट देऊन प्रदर्शनाची शोभा वाढवावी असे संस्थेचे मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारचे प्राचार्य श्री. अनिल महादेव चव्हाण व व्यवस्थापिका सौ. अमृता चव्हाण यांनी आव्हान केले आहे.



