Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ज्ञानदीप स्कूलसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा अविस्मरणीय क्षण प्राचार्या कु. शुभांगी लक्ष्मण पवार यांना ‘BEST PRINCIPAL AWARD – 2026

ज्ञानदीप स्कूलसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा अविस्मरणीय क्षण प्राचार्या कु. शुभांगी लक्ष्मण पवार यांना ‘BEST PRINCIPAL AWARD – 2026

ज्ञानदीप स्कूलसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा अविस्मरणीय क्षण प्राचार्या कु. शुभांगी लक्ष्मण पवार यांना ‘BEST PRINCIPAL AWARD – 2026

वाई (संजीव वरे)- ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाईच्या प्राचार्या कु. शुभांगी लक्ष्मण पवार यांची EMSA INSPIRE 2026 – 5th Edition अंतर्गत देण्यात येणाऱ्या “BEST PRINCIPAL AWARD – 2026” या महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रतिष्ठित सन्मानासाठी निवड झाली होती . त्यामुळे ज्ञानदीप स्कूलच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

EMSA – English Medium Schools Association, Kolhapur यांच्या वतीने आयोजित “Maharashtra State-Level Celebration of Educational Excellence” या भव्य सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, प्रभावी नेतृत्व आणि योगदानाबद्दल कु. शुभांगी लक्ष्मण पवार यांचा गौरव करण्यात आला.

       या सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सन्मानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत आणि कार्याच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेतून त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या समर्पित कार्याची, प्रभावी नेतृत्वाची आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल ज्ञानदीप स्कूलच्या विश्वस्त मंडळातर्फे कु. शुभांगी लक्ष्मण पवार यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संपूर्ण ज्ञानदीप स्कूल परिवाराच्या एकजुटीचा, परिश्रमांचा आणि गुणवत्तापूर्ण कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“ज्ञानदीप स्कूलसाठी अभिमानाचा… गौरवाचा… अविस्मरणीय क्षण!” अशा शब्दांत या यशाचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपस्थित ज्ञानदीप स्कूलचे विश्वस्त श्री. दत्ता मर्ढेकर, डी. डी वाघचवरे, श्री. दिलीप चव्हाण, श्री.रवींद्र जगदाळे, शाळेतील कर्मचारी श्री. शिवराज वरे, स्वप्निल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन ​महाबळेश्वर (प्रतिनिधी):हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४

Live Cricket