राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी सखींचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सातारा – राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा व जावळी तालुक्यातील निवड केलेल्या ३० कृषीसखींना कृषि विज्ञान केंद्र बोरगांव सातारा येथे ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५ दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.
या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत प्रकल्प संचालक आत्मा सातारा श्री. अजय शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा प्रकल्प उपसंचालक श्री. राहुल माने, सहायक कृषि अधिकारी धनाजी फडतरे, कृषि विज्ञान केंद्र बोरगावचे कार्यक्रम समन्वयक महेश बाबर, संग्राम पाटील . सागर सकटे, डॉ स्वाती गुर्वे यांनी , भूषण यादगीरवार यांनी मोहन लाड, अजय साळुंखे यांनी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, बाह्य निविष्ठा खरेदी न करणे, निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणाली विकसित करणे, मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवित करणे, पाण्याची गुणवत्ता वाढवणे, जैवविविधता जतन करणे आणि शेतकरी, त्यांचे कुटुंब आणि ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न पुरवणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.





