ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी शासकीय व खाजगी आस्थापनांत तक्रार निवारण समिती आवश्यक

महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी शासकीय व खाजगी आस्थापनांत तक्रार निवारण समिती आवश्यक

महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी शासकीय व खाजगी आस्थापनांत तक्रार निवारण समिती आवश्यक

सातारा  – महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी आहेत अशा कार्यालयांमध्ये अधिनियम 2013 मधील कलम 4 नुसार अंर्तगत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. जिल्हयात कार्यरत सर्व आस्थापनांनी शासनाच्या SHE BOX PORTAL वरती नोंदणी करणेबाबत आदेशित केलेले आहे आणि आपले कार्यालयाचे नोंदणी झाल्यानंतर आस्थापनेच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची संपूर्ण माहिती सदर पोर्टलवरती अदयावत करावयाची आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील कलम 19 अन्वये आपण आपले कार्यालयात कामकाज करणा-या महिलांना सुरक्षित व अनुकूल वातावरण पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी कार्यालय प्रमुखाची आहे. याअनुषंगाने कार्यालयाची नोंदणी व अंतर्गत तक्रार निवारण समितीची माहिती SHE BOX PORTAL वर अदयावत करणे अधिनियमांतर्गत बंधनकारक आहे. ज्या आस्थापना अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करणार नाहीत अशा शासकिय व खाजगी आस्थापनांना सदर अधिनियमात अतंर्भुत असलेल्या कलम २६ (१) प्रमाणे कार्यालय प्रमुखास व खाजगी आस्थापनांच्या प्रमुखास (मालकास) रक्कम रु. ५०,०००/- रूपयापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सूचना देऊन ही अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केली नसल्यास खाजगी आस्थापनाच्या प्रमुखांना (मालकांना) या कायदयातील कलम २६ (२) नुसार परवाना रदद करुन दुप्पट दंडाची तरतुद करणेत आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी पुढील कार्यवाही टाळण्याकरीता, आपण तात्काळ SHE BOX PORTAL अदयावत करावे. अधिक माहिती करीता पुढिल कार्यालय संपर्क साधावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी .स्टॅण्डजवळ, सातारा संपर्क क्रमांक – ९८५०३५४३९२ व ९८५०१८७१२२ या क्रंमाकावर संपर्क साधावा.

                                          

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket