ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गाठले यशाचे नवे शिखर

यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गाठले यशाचे नवे शिखर

यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गाठले यशाचे नवे शिखर

सातारा : यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा अधिक बळकट केली आहे.

प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या निकालात धनश्री कुर्ले हिने ८.७२एस.जी.पी.ए. मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषया शिवणकर हिने ८.६६एस.जी.पी.ए. मिळवत द्वितीय क्रमांक, तर ऐश्वर्या काळे हिने ८.४५ एस.जी.पी.ए. मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या यशात सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासातील सातत्य, नियोजनबद्ध तयारी आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळ देण्यासाठी महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, आधुनिक संगणक सुविधा आणि तज्ञ प्राध्यापकवर्ग उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्कृष्ट व पोषक शैक्षणिक वातावरण मिळत आहे..

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे आणि प्राचार्य डॉ. व्ही. जे. चवरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket