Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » दीपलक्ष्मी पतसंस्था म्हणजे ज्ञान व धनाचा संगम असणारी पतसंस्था : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

दीपलक्ष्मी पतसंस्था म्हणजे ज्ञान व धनाचा संगम असणारी पतसंस्था : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

दीपलक्ष्मी पतसंस्था म्हणजे ज्ञान व धनाचा संगम असणारी पतसंस्था : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

सातारा दि.2 (प्रतिनिधी) : दीप हे ज्ञानाचे प्रतीक तर लक्ष्मी ही धनाचे प्रतीक आहे म्हणूनच दीपलक्ष्मी पतसंस्था म्हणजे ज्ञान व धनाचा संगम असणारी पतसंस्था आहे असे गौरउद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी दीपलक्ष्मी पतसंस्था शाखा शाहूपुरी २४ व्या वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेल्या विशेष स्नेहसंमेलन प्रसंगी काढले.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, प्राचार्य वि ना लांडगे,संस्थेचे संस्थापक- चेअरमनशिरीष चिटणीस, व्हॉ. चेअरमन आप्पासो शालगर, संचालक अनिल चिटणीस, भगवान नारकर, व्यवस्थापक विनायक भोसले, सह. व्यवस्थापक व शाखाधिकारी रवींद्र कळसकर, जनार्दन निपाणे मान्यवर उपस्थित होते.

यापुढे डॉ. यशवंत पाटणे म्हणाले… दीपलक्ष्मी पतसंस्था ही साहित्य, शिक्षण, अर्थ, व्यापार या सर्व क्षेत्रांशी संबंध असणारी सामाजिक संस्था असून ज्ञान व धन जेथे गुण्यागोविंदाने नांदतात अशी ही संस्था होय. यावेळी शिरीष चिटणीस यांच्या बद्दल आपणाला आदर असून आज सहकार क्षेत्र ज्या चळवळीतून जात आहे ते सर्वजण आपण पाहत आहोत त्यामध्ये शिक्षण व सहकार या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनाशी निगडित असतात व या दोन्ही गोष्टी ते लीलया पार पडतात. सातारा शहरात जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रम घेणारी ही पतसंस्था असून या संस्थेमार्फत आर्थिक सेवेबरोबर सामाजिक बांधिलकी ही जपली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे संस्था नेहमीच आयोजन करून समाजाला आर्थिक तसेच सर्व क्षेत्रात समृद्ध करून मानवतेची सेवा करणारी ही एक संस्था आहे. जर तुमच्यापाशी ज्ञान असेल तर तुम्ही धन अर्जित करू शकता परंतु तुमच्याकडे नुसते धन असेल तर तुम्ही ज्ञान अर्जित करू शकत नाही. बुद्धी हे ज्ञानाचे प्रतीक असून ज्ञान हे प्रथमतः लक्ष्मी ही त्यानंतर येते.

श्रीकांत कात्रे म्हणाले… पतसंस्था किंवा आर्थिक संस्था पैशाचे सर्व व्यवहार करतात परंतु माणूसपणाचा व्यवहार करणारी संस्था म्हणजे दीपलक्ष्मी पतसंस्था होय. माणसाला उभे करण्याचे काम संस्था करत असून त्या व्यक्तीचे सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण टिकून ते पुढे आणण्यासाठी कार्य करणारी संस्था म्हणून दीपलक्ष्मी पतसंस्थेकडे पाहिले जाते. माणूस कसा घडवला पाहिजे त्यासाठी वेगवेगळे उपक्रम ही संस्था सातत्याने राबवत असून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारी ही पतसंस्था आहे. माणसाचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या सर्व गोष्टी करण्यासाठी ही संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे अल्पावधीतच संस्थेने लोकांचा विश्वास कमावला आहे.

शिरीष चिटणीस म्हणाले सातारच्या सर्व क्षेत्रामध्ये योगदान देणारी ही संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे अविरत घड़त आहेत.संस्थेच्या आजमितीस शनिवार पेठ व शाहूपुरी येथे दोन मुख्य वास्तू असून या वास्तू मधून सातारची संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य ही संस्था करत असते. यामध्ये कराओके ची गीत मैफिल, चर्चासत्रे, विविध साहित्यिकांची भाषणे, पुस्तक प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, चित्रप्रदर्शन असे विविध कार्यक्रम घेऊन संपन्न समाज निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलन्याचा प्रयत्न केला जातो. 

सातारा शहरांमध्ये सध्या मोठ्या आर्थिक संस्था येऊन व्यवसाय करत आहेत. सातारच्या शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या स्थानिक पतसंस्थेत ठेवी ठेवून व कर्ज घेऊन पाठिंबा दिला पाहिजे तसेच संस्थेचे आर्थिक व्यवहार पाहून त्यांच्यावर अंकुशही ठेवला पाहिजे असा सल्ला दिला. दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा शहरात नव्हे तर पुण्यामध्ये सुद्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सातारा शहराचा सांस्कृतिक वारसा पुण्यामध्ये सुद्धा जोपासण्याचा प्रयत्न करत आहे.   

यावेळी डॉ.यशवंत पाटणे यांनी आपल्या समृद्ध विचाराने समाजाला प्रेरणा दिली असून त्यांचे कार्य अखंडित चालू आहे तसेच श्रीकांत कात्रे हे एक निस्पृह पत्रकार असून सातारच्या सर्व बातम्या देण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे पार पाडतात. वि .ना. लांडगे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य ही आदर्श आहे. 

वि. ना. लांडगे म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्था ही माणसे जोडण्याचे काम करीत असून संस्थेच्या माध्यमातून सामान्य माणसाची पत सुधारण्याचे काम करत आहे. सगळ्याच गोष्टी ह्या पैशाने विकत घेता येत नाहीत. माणुसकीने माणसे जोडायची असतात. दीपलक्ष्मी पतसंस्था ही सहकारात काम करत असताना सामाजिक बांधिलकीपोटी विविध कार्यक्रम घेऊन समाजाला आर्थिक तसेच सर्व क्षेत्रात समृद्ध करणारी पतसंस्था आहे.ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून माणुसकीचा व्यवहार करणारी जोपासणारी संस्था आहे असे म्हणाले.सदर प्रसंगी संस्थेचे ठेवीदार प्रदीप चोरगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कळसकर यांनी केले असून प्रास्ताविक शिरीष चिटणीस व विनायक भोसले यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास श्री व सौ सुशांत कदम, संतोष घाडगे, अविनाश सकुंडे, कमलाकर दीक्षित, विष्णुपंत सूर्यवंशी, बगाराम पवार, दांडेकर, आबाजी शिंदे, रतन पाटोळे, राहुल वेल्हाळ, अनिल करंबळे, रामचंद्र हनुमंते, अभिनंदन मोरे, अग्नेश शिंदे, लक्ष्मण कदम, रविराज जाधव, अनिल मसुरकर, प्रवीण सपकाळ, शुभम बल्लाळ उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा महाबळेश्वर : बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (BSAM) यांच्या

Live Cricket