इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना संधी!
मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Government-to-Government (G2G) पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या कामगारांच्या पहिल्या तुकडीला प्रातिनिधिक स्वरूपात विमान तिकिटे व व्हिसाचे वितरण केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्लास्टरिंग, सिरॅमिक टायलिंग, बिल्डिंग फॉर्मवर्क आणि आयर्न बेंडिंग या 4 बांधकाम व्यवसायांतील पहिल्या टप्प्यातील 103 कामगारांनी इस्रायली मानकांनुसार प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी 60 कामगारांची पहिली तुकडी 3 सप्टेंबर 2026 रोजी इस्रायलला रवाना होणार आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




