नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » गोव्यात दूधसागर नदीत ३ सख्ख्या भावांसह ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

गोव्यात दूधसागर नदीत ३ सख्ख्या भावांसह ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

 गोव्यात दूधसागर नदीत ३ सख्ख्या भावांसह ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

गोव्यातून धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दूधसागर नदीत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध दूधसागर धबधब्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. मृतांमध्ये तीन सख्या भावांचा समावेश आहे. पाच जणांचा एक ग्रुप नदीवर पोहोण्यासाठी गेला असता शनिवारी (१३ जून) सकाळी दक्षिण गोव्यातील कुळे येथे ही घटना घडली.

रामण्णा परसू मादेर (१९), लक्ष्मण परसू मादेर (१९), हिराण्णा परसू मादेर (२१) असे मृत्यू झालेल्या चिखली गावातील तीन सख्ख्या भावांची नावे आहेत. तर, विजय सजिली (२०) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वास्को येथील चौथ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यापैकी दोघेजण वास्को येथील खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास दूधसागर नदीत चार युवक बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ मेटावाडा, कुळे येथील घटनास्थळी धाव घेतली. प्रसिद्ध दूधसागर धबधब्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. मात्र, तिघांचा मृतदेह अद्याप बेपत्ता होता. पोलिसांनी दृष्टी जीवरक्षकांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले. शोधकार्यानंतर अखेर तिघांचे मृतदेह आढळून आले.

युवक ट्रेनने प्रवास करत साडेनऊ ते दहाच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. पोहोण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला.

“उन्हाळी सुट्टी समाप्त झाल्यानंतर, थोड्याच दिवसात कॉलेज सुरु होणार होते. यापूर्वी पिकनिकला जाण्याचे त्यांनी ठरवले होते. पाच जणांनी दूधसागर नदीपर्यंत ट्रेकिंग करुन पोहोण्याचा आनंद घेण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, यात पाचपैकी एकाला वाचविण्यात यश आले पण चारजण दगावले. कुळे पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket