नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » आ.मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड उत्तरसाठी १७६ डी.पी. मंजूर

आ.मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड उत्तरसाठी १७६ डी.पी. मंजूर

आ.मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड उत्तरसाठी १७६ डी.पी. मंजूर

गावठाण व शेतीतील वीज पुरवठा होणार सुरळीत

कराड (प्रतिनिधी)कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पुढाकार घेतला असून, कराड उत्तरसाठी तब्बल १७६ नवीन डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतीसाठी ९७ तर गावठाण अंतर्गत ७९ डी.पी. बसविण्यात येणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्णतः ग्रामीण व शेतीप्रधान भाग असून या भागातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना वारंवार मोटार ट्रिप होणे, लाईट जाणे, डी.पी. जळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते.

या समस्येची गंभीर दखल घेत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतातील जुने व कमी क्षमतेचे डी.पी. बदलण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी ६० क्षमतेचे डी.पी. आहेत त्या ठिकाणी आता १०० क्षमतेचे डी.पी. बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त वीज भार कमी होऊन वीज पुरवठा अधिक सुरळीत व अखंडित होणार असल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्रातही वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून वारंवार वीज खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी गावठाण अंतर्गतही मोठ्या प्रमाणात नवीन डी.पी. बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये अतित अंतर्गत ८, खोजेवाडी अंतर्गत ८, काशीळ अंतर्गत ८, नागठाणे अंतर्गत ४, तारगाव अंतर्गत १०, किरोली अंतर्गत ११, आर्वी-नागझरी अंतर्गत ८, वाठार किरोली अंतर्गत ९, पाल अंतर्गत ६ तसेच मसूर अंतर्गत ७ डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कराड उत्तरमधील शेती व गावठाण परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम होऊन शेतकरी व ग्रामस्थांना मोठा लाभ होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket