नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर च्या प्राध्यापकांचे नवसंशोधनात भरीव कामगिरी शिक्षण तज्ञांकडून प्राध्यापकांचे कौतुक. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल.

गौरीशंकर च्या प्राध्यापकांचे नवसंशोधनात भरीव कामगिरी शिक्षण तज्ञांकडून प्राध्यापकांचे कौतुक. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल. 

गौरीशंकर च्या प्राध्यापकांचे नवसंशोधनात भरीव कामगिरी शिक्षण तज्ञांकडून प्राध्यापकांचे कौतुक. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल. 

लिंब- औषध निर्माण क्षेत्रात दर्जात्मक शिक्षणाचे ज्ञानकेंद्र म्हणून ओळख असणाऱ्या गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब, महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध आजारावर नव संशोधन करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची छाप पडली आहे. मानवी शरीरातील निर्माण होणारे विविध आजार व त्यावर प्रभावी व परिणामकारक ठरू पाहणारे नव संशोधन करून औषध निर्माण क्षेत्रात एक नवा इतिहास महाविद्यालयाने निर्माण केला आहे. यामध्ये प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांनी मानवी शरीरात निर्माण होणारा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सखोल संशोधन करून औषध निर्माण क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पंधरा शोध निबंध यासंदर्भात सादर करून आरोग्य सेवेला पूरक कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी औषधशास्त्रावर एक पुस्तकही लिहिले आहे. त्यांच्या नावावर एक पेटंट ही प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर डॉ. भूषण पवार यांनी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगावर नवसंशोधन करून ते नियंत्रित ठेवण्यासाठी यारोळे या वनस्पतीचा औषधांमध्ये वापर करून स्तनाचा कर्करोग नियंत्रित ठेवता येतो हे सिद्ध केले आहे त्यांचेही दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे डॉ. धैर्यशील घाडगे यांनीही स्वादुपिंडाच्या कर्करोगावर सखोल संशोधन करताना महिलांच्या अंडाशयाच्या कर्करोग व फुफ्फुसाचा कर्करोग यावर नवसंशोधन करून जागतिक संशोधनाची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील डॉ. माधुरी मोहिते यांनीही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशय पिशवीच्या कर्करोगावर नवसंशोधन करून यावर प्रभावी व परिणामकारक ठरु पाहणाऱ्या औषध निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे प्रा. नूतन गवांदे यांनी क्षयरोग (टी. बी.) या विषयावर नाविन्यपूर्ण संशोधन करताना क्षयरोग चे निर्मूलन करण्याकरिता नवसंशोधन केले आहे. त्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेले आहे त्यांच्या या नवसंशोधनाला प्रोसेस पेटंट प्राप्त झाले आहे. प्रा. गौरी इथापे प्रा. नूतन कांबळे व प्रा. प्राजक्ता कांबळे यांनीही औषध निर्माण क्षेत्रातील नव संशोधनाला पूरक कार्य करीत आहेत. त्यांनी ब्रिटिश फार्माकोपीआ या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात त्यांच्या उल्लेखनीय कार्याची नोंद झाली आहे.

गौरीशंकर च्या प्राध्यापकांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे.

नवसंशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या या प्राध्यापकांचा संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले आहे. 

औषध निर्मिती क्षेत्रात नवसंशोधन करणाऱ्या प्राध्यापकांचा सार्थ अभिमान वाटतो असे मत संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की संस्थेच्या उभारणीच्या काळात जे उच्च शिक्षणासाठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्था उभी केली ती आज साध्य होताना दिसून येत आहे. अर्थात येथील तज्ञ प्राध्यापकांचे योगदान खूप मोलाचे आहे. प्राध्यापकांना उपलब्ध करून दिलेल्या अद्यावत सोयी सुविधेचा लाभ नवसंशोधनासाठी झाला. मानवी शरीरातील आजार व त्यावर नाविन्यपूर्ण संशोधन ही काळाची गरज आहे. ती गरज पूर्तीसाठी येथील तज्ञ प्राध्यापक कार्य करतात याचा सार्थ अभिमान वाटतो. मदनराव जगताप, अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी, सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket