नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भिलार येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाई जिमखाना उत्कर्ष पतसंस्था कबड्डी संघाचा दैदिप्यमान तृतीय क्रमांक

भिलार येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाई जिमखाना उत्कर्ष पतसंस्था कबड्डी संघाचा दैदिप्यमान तृतीय क्रमांक

भिलार येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाई जिमखाना उत्कर्ष पतसंस्था कबड्डी संघाचा दैदिप्यमान तृतीय क्रमांक

वाई प्रतिनिधी -ग्रामस्थ मंडळ, पुस्तकांचं गाव भिलार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हौशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाई जिमखाना उत्कर्ष पतसंस्था कबड्डी संघाने उल्लेखनीय आणि दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. राज्यभरातील अनेक नामांकित आणि बलाढ्य संघांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत वाईच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्तबद्ध बचाव आणि आक्रमक चढायांच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच संघाने आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रत्येक सामन्यात लढाऊ वृत्ती दाखवली. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, समन्वय आणि विजयासाठीची धडपड यामुळे संघाने उपांत्य फेरीपर्यंत दमदार मजल मारत अखेर तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले. संघाच्या या यशामुळे वाई शहरासह परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाई जिमखाना उत्कर्ष पतसंस्था कबड्डी संघाचे संघमालक, वाई जिमखान्याचे अध्यक्ष तसेच उत्कर्ष पतसंस्थेचे संचालक श्री. अमर कोल्हापुरे यांनी संघ उभारणीपासून खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळावे आणि कबड्डीसारख्या मातीतल्या खेळाला नवे बळ मिळावे, या उद्देशाने त्यांनी क्रीडा क्षेत्राला सातत्याने पाठबळ दिले आहे.

संघाचे टीम मॅनेजर कुणाल तांबोळी यांनी स्पर्धेदरम्यान संघाचे नियोजन, व्यवस्थापन आणि खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या योग्य नियोजनामुळे आणि संघभावनेमुळे खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत हा मानाचा तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत संघाचे खेळाडू म्हणून प्रतीक कोंडलकर, रोहित मोहिते, समीर शेख, अनिकेत वाघ, जयंत अर्जुन, कुणाल जाधव, प्रतीक पवार, अभि मगर, रोहन बिल्ले, विजय गायकवाड आणि माऊली डोंबाळे यांनी उल्लेखनीय खेळ करत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.

संघाच्या या यशाबद्दल वाई जिमखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे तसेच संचालक रमेश यादव, मंगला अहिवळे, वैभव फुले, अमीर बागुल, शैलेन्द्र देवकुळे, प्रीती कोल्हापुरे, नितीन वाघचौडे, प्रशांत मांढरे आणि आनंद डुबल यांनी संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून खेळाडू, व्यवस्थापन आणि समर्थकांचे अभिनंदन करण्यात येत असून वाई जिमखाना आणि उत्कर्ष पतसंस्थेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे. भविष्यातही संघ अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket