जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विवेकी पालकत्व विषयावर व्याख्यान संपन्न नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री मंगलप्रभात लोढा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन समर्थ खामकर व समशेर शिंदे दिव्यांशु डुबल व शौर्य पवार यांना सुवर्णपदक ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » तळदेव शासकीय दवाखान्यात निकृष्ट कामाचा काळाबाजार; अर्धवट कामामुळे रुग्णांचे हाल, जीव धोक्यात”

तळदेव शासकीय दवाखान्यात निकृष्ट कामाचा काळाबाजार; अर्धवट कामामुळे रुग्णांचे हाल, जीव धोक्यात”

“तळदेव शासकीय दवाखान्यात निकृष्ट कामाचा काळाबाजार; अर्धवट कामामुळे रुग्णांचे हाल, जीव धोक्यात”

महाबळेश्वर (राजेश सोंङकर)महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथील शासकीय दवाखान्याच्या दुरुस्ती कामामध्ये गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेल्या कामांमध्ये नियमांची उघडपणे पायमल्ली झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, संबंधित कामांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दवाखान्याच्या दुरुस्तीमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून अनेक ठिकाणी काम अपूर्ण व धोकादायक अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, पावसाळा तोंडावर आला असतानाही दवाखान्याचे काम आजही अर्धवट अवस्थेत सुरू असल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने रुग्णांच्या आरोग्याला व जीवाला धोका निर्माण झाला आहे.

सध्या दवाखान्यात रुग्ण तपासणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. जागेअभावी कर्मचारी देखील अडचणीत काम करत असून आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. इमर्जन्सी परिस्थितीत गंभीर रुग्णांना तातडीने महाबळेश्वर येथील दवाखान्यात स्थलांतर करावे लागत असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात जबाबदार व जागृत नागरिक उत्तम भालेराव यांनी संबंधित विभागाकडे लेखी निवेदन सादर करून सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. “शासनाचा निधी जनतेच्या आरोग्यासाठी असताना काही भ्रष्ट व निष्काळजी घटकांनी तो लाटण्याचे काम केले आहे. निकृष्ट कामामुळे आज रुग्णांचे जीव धोक्यात आले असून हा प्रकार प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी अनेकदा तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. संबंधित ठेकेदार, अभियंते व कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर लोकायुक्त, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग तसेच न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

तळदेव येथील शासकीय दवाखान्याची सध्याची अवस्था पाहता शासनाने तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच अर्धवट काम तातडीने पूर्ण करून रुग्णांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता नागरिकांतून तीव्र होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न

जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न सातारा दि. 22 :- महाराष्ट्र राज्यातील

Live Cricket