नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » प्रशासकीय » औषध दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करण्याचे प्रशासनाचे आवाहन

औषध दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करण्याचे प्रशासनाचे आवाहन

औषध दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करण्याचे प्रशासनाचे आवाहन

सातारा- अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २० मे २०२६ रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा, तसेच आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सातारा येथील सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातील मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर, संघटनेने घोषित केलेली काही औषध दुकाने, रुग्णालय संलग्न औषध दुकाने तसेच जेनेरिक औषध दुकाने नियमितपणे सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

औषध दुकानदारांना दिलेले परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत विविध अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याने बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे आणि आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी केले आहे.

दरम्यान, नागरिकांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे :

१) श्री. रु. वि. पोंगळे, सहाय्यक आयुक्त (औषधे), सातारा जिल्हा – ९७३००८५५८८

२) श्री. वि. वि. पाटील, औषध निरीक्षक, सातारा – ९१५८८२०७८५ येथे संपर्क साधावा. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket