नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल; वर्षा संतोष पार्टे यांना राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्कार

सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल; वर्षा संतोष पार्टे यांना राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्कार

म’श्वर इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांचा राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्काराने गौरव

महाबळेश्वर: महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष स्व पी डी शेठ पार्टे व माजी नगराध्यक्षा,विद्यमान नगरसेविका विमलताई पार्टे यांच्या स्नुषा इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय समाजकार्याची दखल घेत वाई येथील उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था यांच्या सहाव्या वर्धापनदिना निमित्त राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्काराने गौरविण्यात आले

                 वाई येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सत्यवती जोशी सभागृह,कन्या शाळा येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कला, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक व व्यावसायिक आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांना गेल्या वर्षभरात क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची, गरजूंपर्यंत पोहोचवलेल्या मदतीची तसेच सातत्यपूर्ण समाजसेवेची दखल घेत प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश प्रभाकर पाटील,वाई अर्बन बँकेचे सीए राजेंद्र अमृत गाडगीळ, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर रघुनाथ जोशी, निवृत्त शास्त्रज्ञ धर्मा मारुती काळे,श्याम चावलानी,श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मनिषा शिरीष घैसास तसेच उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या सचिव तृप्ती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक घागरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विपिन नारायण वैराट यांनी मानले.

हा पुरस्कार स्वीकारताना वर्षा पार्टे यांनी हा सन्मान इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या सर्व सदस्य, पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या सामूहिक कार्याचा गौरव असल्याचे सांगितले या पुरस्कारामुळे समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने व समर्पणाने करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket