Home » ठळक बातम्या » सातारा शहरात अवैधपणे अश्लील कृत्य करण्यास अपप्रेरणा दिल्याने कॅफे चालकावर कारवाई

सातारा शहरात अवैधपणे अश्लील कृत्य करण्यास अपप्रेरणा दिल्याने कॅफे चालकावर कारवाई 

सातारा शहरात अवैधपणे अश्लील कृत्य करण्यास अपप्रेरणा दिल्याने कॅफे चालकावर कारवाई 

सातारा -श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग यांनी सातारा शहर परिसरात चालत असलेल्या अवैद्य कॅफेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

पो. नि .सचिन म्हेत्रे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत सीजन कॅफे, द फूड कोर्ट, पत्ता-विमल एम्पायर, राजलक्ष्मी थिएटर चे बाजूला, देवी चौक, सातारा येथे कॅफेमध्ये काही अल्पवयीन मुले अश्लील कृत्य करत असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला असता कॅफे चालक मंथन मोहन. तावरे, वय 26 वर्ष, धंदा- कॅफे चालक, रा. मंगळवार पेठ,सातारा याने त्याचे कॅफेमध्ये कापडी पडदे लावून रूम तयार करून तेथे बसण्यासाठी सोयी सुविधा पुरवून त्या पैसे घेऊन भाड्याने अल्पवयीन मुला-मुलींना देऊन अश्लील कृत्यास अप प्रेरणा देताना मिळून आला म्हणून त्याचे वर सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 404/2026 पॉक्सो ॲक्ट कलम 12,17 अन्वये नोंद करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सपोनी अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे,पोलीस अंमलदार पंकज मोहिते, विक्रम माने, सुहास कदम, महिला अंमलदार सरोज शिंदे, पूजा शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket