Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर गिरिस्थान प्रशालेचा १२ वीचा निकाल ९१.८३%; वाणिज्य शाखेत संचिता केळगणे, तर कला शाखेत भरत ढवळे प्रथम

महाबळेश्वर गिरिस्थान प्रशालेचा १२ वीचा निकाल ९१.८३%; वाणिज्य शाखेत संचिता केळगणे, तर कला शाखेत भरत ढवळे प्रथम

महाबळेश्वर गिरिस्थान प्रशालेचा १२ वीचा निकाल ९१.८३%; वाणिज्य शाखेत संचिता केळगणे, तर कला शाखेत भरत ढवळे प्रथम

महाबळेश्वर –महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद संचलित *गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय*, महाबळेश्वरने यंदाच्या १२ वीच्या (कला व वाणिज्य) परीक्षेत आपले यशाचे सातत्य टिकवून ठेवले₹ आहे. फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेत महाविद्यालयाचा एकूण निकाल ९१.८३% लागला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

शाखानिहाय निकाल आणि गुणवंत विद्यार्थी

१. वाणिज्य शाखा (निकाल ९४.८२%):

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. या शाखेत संचिता संदीप केळगणे हिने ८३.१७% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला.

 प्रथम: कु. संचिता संदीप केळगणे (८३.१७%)

 द्वितीय: कु. पूनम शरद चिकणे (७०.३३%)

 तृतीय: कु. श्रुती नंदीप घाडगे (६८.६७%)

२. कला शाखा (निकाल ८७.०५%):

कला शाखेतही विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली असून यामध्ये भरत धाऊ ढवळे याने बाजी मारली आहे.

 *प्रथम:* चि. भरत धाऊ ढवळे (८३.६७%)

 *द्वितीय:* कु. अस्मिता तानाजी मालुसरे (६९.५०%)

 *तृतीय:* कु. सुहानी सुरेश शिर्के (६६.००%)

*मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव:*

या दैदीप्यमान यशाबद्दल नगराध्यक्ष सुनील शिंदे उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, शिक्षण सभापती रोहित ढेबे मुख्याधिकारी योगेश पाटील,प्राचार्या रोहिणी बगाडे आणि माजी प्राचार्य पी.आर. माने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कष्टाला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गिरीस्थान प्रशालेच्या या निकालामुळे महाबळेश्वर शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा नाव गाजले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket