साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » देश » शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा घराघरात पोहोचवा; जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांचे आवाहन.

शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा घराघरात पोहोचवा; जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांचे आवाहन.

शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा घराघरात पोहोचवा; जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांचे आवाहन.

महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर तालुका आणि शहर शिवसेना वैद्यकीय कक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज येथे उत्साहात संपन्न झाली. सातारा जिल्हा शिवसेना वैद्यकीय कक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत, तळागाळातील रुग्णांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ आणि तातडीची वैद्यकीय मदत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला.

प्रमुख उपस्थिती आणि नियोजन

या बैठकीचे यशस्वी नियोजन शिवसेना तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षाताई आरडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजूभाऊ पंडित आणि महाबळेश्वर शहर वैद्यकीय अधिकारी गोविंदभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी सातारा वैद्यकीय संपर्क प्रमुख राजेंद्रभाऊ बर्गे आणि महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजयभाऊ नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘शिवसेनेचे पदाधिकारी हे रुग्णसेवेचे दूत’

बैठकीला संबोधित करताना जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण म्हणाले की, “शिवसेना वैद्यकीय कक्षाचा मुख्य उद्देश हा गरजू रुग्णांना वेळेत उपचार आणि आर्थिक लाभ मिळवून देणे हा आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे. सातारा जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयांशी समन्वय साधून रुग्णांना तातडीने दिलासा द्यावा.”

चव्हाण यांनी पुढे आश्वासन दिले की, रुग्णांच्या मदतीसाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मार्गदर्शनासाठी पदाधिकारी त्यांना कधीही थेट संपर्क करू शकतात. रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते ‘दूत’ म्हणून काम करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दवाखान्यात आधुनिक सुविधांची मागणी:

या बैठकीदरम्यान राजेंद्र पंडित यांनी स्थानिक आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधले. महाबळेश्वर येथील मोरारजी गोकुळदास रुरल हॉस्पिटल मध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच डायलिसिस सेंटर तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा समन्वयक दीपक चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा करावा आणि मदत करावी, असे आवाहन पंडित यांनी केले.

 या बैठकीला महाबळेश्वर तालुका आणि शहरातील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आरोग्य सेवेचा हा वसा अधिक जोमाने पुढे नेऊ आणि प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत मदत पोहोचवू,” असा निर्धार सर्व उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket