मार्च अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे
सातारा – जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालय यांनी मार्च 2026 अखेरचे ई आर-1 तिमाही विवरणपत्र कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर दि.30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले.
ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड या कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.




