नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » जागतिक वारसा कास पुष्प पठारावर स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक वारसा कास पुष्प पठारावर स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक वारसा कास पुष्प पठारावर स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सातारा – जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पुष्प पठार येथे आज स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सातारा वनविभागाच्या पुढाकारातून “कचरामुक्त कास पठार” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथील राष्ट्रीय हरित सेना व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या मोहिमेदरम्यान कास पठार परिसरातील मुख्य गेट ते चोरटका तसेच नवरा-नवरी डोंगर ते वेस्टर्न घाट हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा गोळा करण्यात आला. याशिवाय चोरटका ते कासाणी पार्किंग परिसरातील कचऱ्याचेही संकलन करण्यात आले. गोळा केलेला सर्व कचरा एकत्र करून तो सातारा नगरपरिषदेच्या वाहनाद्वारे कचरा डेपोत पाठविण्यात येणार आहे.

या उपक्रमावेळी कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे एनसीसी ऑफिसर कैलास बागल सर, मुख्याध्यापक कौस्तुभ वैद्य, उपमुख्याध्यापक खोमणे सर, पर्यवेक्षक कल्याणकर सर, सौ. अनिता कदम, सौ. राधिका देशपांडे यांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.

वनविभागाकडून वनपाल राजाराम काशीद (रोहोट), उज्वला थोरात (बामनोली), वनरक्षक समाधान वाघमोडे (कास), प्रकाश शिंदे (रोहोट), जयंत निकम (खडगाव) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

माननीय उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रौंदळ व वनपरिक्षेत्राधिकारी जोपळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली.या उपक्रमामुळे कास पठार परिसर स्वच्छ राखण्याबाबत जनजागृती होत असून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket