Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचे सरकारला ‘हे’ दोन सवाल

रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचे सरकारला ‘हे’ दोन सवाल

रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचे सरकारला ‘हे’ दोन सवाल

 अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबई आणि बारामतीमधील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. यावरून रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. याच अनुषंगाने रोहित पवारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे यांनीही राज्य सरकारला दोन महत्वाचे प्रश्न विचारले. दुसरीकडे सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. यावरूनही अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळेंनी पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली. 

रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे म्हणाले की, “अजित पवारांच्या अपघात प्रकरणात काही काळंबेरं आहे का? असा संशय निर्माण होतोय. कारण सरकार एफआयआर का दाखल करून घेत देत नाहीये? एफआयआरला सरकार का घाबरतंय? अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकार संशय निर्माण करत आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं काय झालं? अद्याप कळालं नाही. सरकार अशा प्रकारे संशयाची भूतं नाचवत आहे. मात्र, माझा फक्त एक प्रश्न आहे की एफआयआर नोंदवून का घेतला जात नाही आणि तो एफआयआर नोंदवला जाऊ नये यासाठी सरकार का प्रयत्न करतंय? याची उत्तरे सरकारने द्यावी”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

जनता सरकारला सोडणार नाही”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर रोहित पवार आक्रमक

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबई आणि बारामती येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटनंतर रोहित पवारांनी सरकारवर टीका केली. रोहित पवार म्हणाले की, “केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी सांगितलं होतं की, एक महिन्याच्या आत आम्ही अपघातासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करू. अपघाताला आज एक महिना होत आहे. आज आणि उद्या आम्ही अहवाल येतो की नाही? याची वाट पाहणार आहोत. जर थातूरमातूर अहवाल दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही”, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुनर्वशीत गावांच्या विकासासाठी कटिबद्धभांबे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुनर्वशीत गावांच्या विकासासाठी कटिबद्धभांबे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन कराड -भांबे तालुका कराड येथे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या

Live Cricket