नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पौष्टिक तृणधान्य महोत्सव 20 व 21 फेब्रुवारी रोजी

पौष्टिक तृणधान्य महोत्सव 20 व 21 फेब्रुवारी रोजी

पौष्टिक तृणधान्य महोत्सव 20 व 21 फेब्रुवारी रोजी

सातारा दि.18: कृषी विभागामार्फत प्रशासकीय इमारत प्रांगण, पारंगे चौक, एस टी स्टँण्ड पाठीमागे सातारा येथे दि. 20 व 21 फेब्रुवारी या कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, यांच्या हस्ते होणार आहे.

या महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सूचित्रा परळी खोन्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, मान व खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध होणार आहेत. कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेली मुग, उडीद, काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध होणार आहेत.

त्याचबरोबर महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यात उत्पादित झालेली व उच्च कुरकुमिन असलेली वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, खंडाळा येथील देशी बाजरी, कन्हाडची नाचणी, जावळी, पाटणचा देशी इंद्रायणी तांदूळ, फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळांचा आस्वाद घेता येणार आहे.

20 व 21 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये थेट शेतकऱ्यांच्या शेतातून ताजे व स्वच्छ अन्नधान्य, व दर्जेदार फळाच्या खरेदीचा लाभ जिल्हयातील ग्राहकांनी घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket