नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » प्रशासकीय » मरळी येथे 1 ते 5 एप्रिल दरम्यान डोंगरी महोत्सव

मरळी येथे 1 ते 5 एप्रिल दरम्यान डोंगरी महोत्सव

मरळी येथे 1 ते 5 एप्रिल दरम्यान डोंगरी महोत्सव

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठीच्या जबाबदाऱ्या चोख पार पाडा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.18 : मरळी येथे डोंगर महोत्सवाचे 1 ते 5 एप्रिल 2026 या कालाधीत आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत कृषी, पशुपक्षी व बचत गटांच्या उत्पदीत मालाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याची विविध विभागांनी आतापासून तयारी करावी व विभाग प्रमुखांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत त्या चोख पार पाडाव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात डोंगरी महोत्सव तयारीचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी, पशुपक्षी व बचत गटांचा मेळा आयोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागांशी सन्मवय साधावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, डोंगरी महोत्सवात भजन, बॅन्ड, पोवाडे व लावणी स्पर्धांबरोबर फुड स्टॉल, फनफेअर यासह मनोरंजन कार्यक्रम असणार आहेत. डोंगरी महोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा.

डोंगरी महोत्सवांतर्गत मरळी जवळ कोयना नदी पात्रात नागरिकांना बोटींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या बोटींगसाठी जलसंपदा विभागाने ना हकरत प्रमाणपत्र द्यावे. नाडे-नवा रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसेच ठिक-ठिकाणी रंगरंगोटी करावी. तसेच महोत्सव कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षताही घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket