साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सांडपाणी मोहिमेनंतर वनविभागाचा शिकाऱ्यांना दणका वन्यप्राणी रानडुक्कर शिकार प्रकरणी एक गाडी जप्त व दोन जण ताब्यात

सांडपाणी मोहिमेनंतर वनविभागाचा शिकाऱ्यांना दणका वन्यप्राणी रानडुक्कर शिकार प्रकरणी एक गाडी जप्त व दोन जण ताब्यात

सांडपाणी मोहिमेनंतर वनविभागाचा शिकाऱ्यांना दणका वन्यप्राणी रानडुक्कर शिकार प्रकरणी एक गाडी जप्त व दोन जण ताब्यात

महाबळेश्वर -दिनांक १७/०२/२०२५ रोजी वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर श्री. सुनिल लांडगे हे श्री. तुकाराम निकम वनरक्षक तळदेव अति. कार्यभार वनरक्षक महाबळेश्वर यांच्यासह गस्त करीत असताना महाबळेश्वर फॉ. कं.नं.७९ मधुसागर राईडवर वन्यप्राणी रानडुक्कर शिकार करून गाडी क्र. MH-08-R-0663 मध्ये घेऊन जात असताना प्रत्यक्ष जागेवर रंगेहात आरोपी संजय लक्ष्मण गोळे व अजय महादेव कोंडाळकर रा. लिंगमळा ता. महाबळेश्वर यांना वनगुन्हा करताना पकडले. भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ कलम २,९,३९,४४,४८१ व ५१ अंतर्गत प्र.गु.रि.क्र. ०२/२०२६ वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी दि. १७/०२/२०२६ रोजी नोंद केला आहे. सदर गुन्ह्यामधील मारुती ओमनी जप्त करण्यात आली असून आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे.

श्री. प्रदीप रौंधळ, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, श्री. महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर यांनी घटनास्थळावर जाऊन गुन्ह्याची चौकशी केली व आरोपीची सखोल चौकशी करून जबाब नोंदविले. वन्यप्राणी शिकार करणे वनकायद्याने बंदी आहे अश्याप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास १ ते ३ वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास किंवा पंचवीस हजार ते एक लाख रुपया पर्यंतचा द्रव्यदंड किवा या दोन्ही होऊ शकतात.

सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली, श्री. प्रदीप रौंधळ, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, श्री. महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर, श्री. सुनील लांडगे वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर, श्री. तुकाराम निकम वनरक्षक तळदेव अति. कार्यभार वनरक्षक महाबळेश्वर, श्री. बाबू मराडे वनरक्षक मांघर, संतोष काळे, संतोष बावळेकर वनमजूर, निलेश सपकाळ, विशाल जाधव, गणेश वागदरे, समीर उतेकर रोजंदारी मजूर यांचेसमवेत पार पडली असून पुढील तपास श्री. महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर करीत आहेत,

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे, वन्यप्राणी बाळगणे, वन्यप्राण्यांना खाऊ घालणे, त्रास देणे व इजा पोहचविणे अथवा वनक्षेत्रात कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे असे अवैध प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल. अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनविभागास कळवून वनविभागाला सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket