अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » ​कुसुंबी गटात परिवर्तनाचा गुलाल; शिवसेनेच्या विजयाने जावळीत उत्साह

​कुसुंबी गटात परिवर्तनाचा गुलाल; शिवसेनेच्या विजयाने जावळीत उत्साह

कुसुंबी गटात परिवर्तनाचा गुलाल; शिवसेनेच्या विजयाने जावळीत उत्साह

मेढा प्रतिनिधी:जिल्हा परिषद निवडणुकीत जावळी तालुक्यातील कुसुंबी गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून मतदारांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली असून कुसुंबी गट विकासकामांच्या बाबतीत अग्रेसर ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. अशी ग्वाही कुसुंबी जिल्हा परिषदेच्या गटाच्या नवनिर्वाचित सदस्या कविताताई ओंबळे यांनी दिली.

कुसुंबी गटातून निवडून आल्याबद्दल कुसुंबी गटातील गावांमध्ये मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, पंचायत समिती सदस्य आतिश कदम ,पंचायत समिती सदस्या सुनीता दुंदुळे,शिवसैनिक व राष्ट्रवादी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कविताताई ओंबळे म्हणाल्या, जावळी तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार असून दुर्गम डोंगराळ जावळी तालुक्यातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. एकनाथ ओंबळे म्हणाले, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईत जनशक्तीचा विजय झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पसंती दिली आहे. मतदारांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करू .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून जावळी तालुक्याच्या विकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी काम करणार आहे.

बऱ्याच वर्षांनंतर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याने शिवसैनिक उत्साहात विजयी रॅली मध्ये सहभागी झाले होते. गावोगावी विजयी उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विजयी रॅली मध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket