मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल वायरमन , कॉम्प्युटर ऑपरेटर कोर्सेस चे निकाल जाहीर  नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांची गारमेंट इंडस्ट्री मध्ये निवड
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला

भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला

भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला

विलासराव देशमुखांच्या सन्मानार्थ कराड काँग्रेसचे रस्त्यावर आंदोलन 

कराड- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ कराड दक्षिण व शहर काँग्रेसच्या वतीने कराड शहरातील दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्यांनी दिवंगत आणि लोकमान्य नेत्यांविषयी केलेली बेताल वक्तव्ये राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाहीत, असा ठपका यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठेवला.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “विलासराव देशमुख अमर रहे”, “रवींद्र चव्हाण मुर्दाबाद”, “भाजपा मुर्दाबाद” अशा जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला. भाजप नेत्यांनी इतिहासातील योगदान विसरून राजकीय टीका करणे चुकीचे असून, अशा वक्तव्यांमुळे समाजात द्वेषाची भावना पसरते, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

आंदोलनादरम्यान नामदेवराव पाटील यांनी सांगितले की, विलासराव देशमुख यांनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्ते, सिंचन, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मितीस प्राधान्य देण्याचे धोरण त्यांनी राबवले. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील विकासातील असमतोल दूर करण्यासाठी विशेष योजना राबवून दुर्लक्षित भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले.

लोकशाही मूल्ये, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकास ही विलासराव देशमुख यांची ओळख होती. सामान्य जनतेशी थेट संवाद, शांत आणि संयमी नेतृत्वशैली यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वमान्य व्यक्तिमत्त्व ठरले. अशा लोकनेत्यांविषयी अवमानकारक वक्तव्य करणे हे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या आंदोलनात कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अमित जाधव, नानासो जाधव, सत्यजीत पाटील, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा वैशालीताई जाधव, उपाध्यक्षा शेवाळे मॅडम, रवि बडेकर, गोल्डन पवार, राहुल पवार, सुरेश भोसले, विजय माने, मुजीर बागवान, उमर सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पाटील म्हणाले कि, लातूर मध्ये जाऊन रवींद्र चव्हाणांनी विलासरावांच्या बद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य लातूरची जनता खपवून घेणार नाही. जशी कराडची ओळख पृथ्वीराज चव्हाण तशीच लातूरची ओळख विलासराव देशमुख अशी टिपणी यावेळी त्यांनी नमूद केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ  

मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   मुंबई, दि. १३ : देशभरात तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे आणि मुलांमध्ये

Live Cricket