साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » प्रभागाला ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा आशाताई वन्ने यांचा संकल्प

प्रभागाला ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा आशाताई वन्ने यांचा संकल्प

प्रभागाला ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा आशाताई वन्ने यांचा संकल्प

पाचगणी  (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक ९ (अनुसूचित जातीकरिता आरक्षित) मधून सौ.आशाताई नितीन वन्ने यांनी निवडणुकीच्या मैदानात उभे राहत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प जाहीर केला आहे. प्रसिध्दीपासून दूर राहून लोकहितासाठी कार्य करणाऱ्या आशाताई वन्ने यांनी पती नितीन वन्ने यांच्या सोबतीने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा, डोंगराळ भागातील कच्चे रस्ते काँक्रिटीकरण, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाची सुधारित यंत्रणा हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांना स्वयंरोजगार, युवकांसाठी व्यवसायभिमुख प्रशिक्षण व कर्ज योजनांची उपलब्धता, विशेष रुग्णवाहिका व शववाहिनी, नाना-नानी पार्क आणि वाचन कट्टा उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

सिद्धार्थनगर वस्तीतील रस्त्यांच्या बिकट समस्यांवर तोडगा, उंच ठिकाणी पाणीटाकी, तसेच कंत्राटी कामगारांच्या हितासाठी सतत प्रयत्न हे त्यांचे विशेष प्राधान्य असेल.प्रभागाचा विकास म्हणजे आपला विकास” असा नारा देत, आशाताई वन्ने यांनी नागरिकांना आपल्या ‘विकास संकल्पा’ला साथ देण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket