स्व.दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वाईत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वाई : दिनांक २८ नोव्हेंबर रोजी द.पां. मेणबुदले प्रतिष्ठान, पंचायत समिती वाई आणि कलाध्यापक संघ वाई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाई तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कलात्मक प्रतिभा सादर केली.
विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना शाळेपासून स्पर्धेच्या ठिकाणी व्यवस्थित आणण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला. काही पालकांनीही स्वतःहून आपल्या पाल्यांना स्पर्धेत सहभागी करून घेतले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व कलाशिक्षकांनी मोलाचे योगदान दिले. तसेच काही माजी कलाशिक्षकांनीही आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी डॉ.महेश मेणबुदले, सोमनाथ राऊत, सुनील जाधव,हर्षवर्धन मोरे, आनंद माने,हिंदूराव डेरे, श्रीकांत वालेकर, अजित जगताप, शिवाजी जमदाडे यांच्यासह द.पां.मेणबुदले प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, कलाशिक्षक, माजी कलाशिक्षक आणि पालक या सर्वांचे द. पा. मेणबुदले प्रतिष्ठान, पंचायत समिती वाई आणि कलाध्यापक संघ वाई यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



