समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी जपानमधील उद्योगभेटींमधून यशोदाचा जागतिक शैक्षणिक विस्तार ‘यशोदा’च्या विद्यार्थ्यांची जपानमध्ये यशस्वी भरारी; उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांची विद्यार्थ्यांशी भेट मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ दुचाकी वाहनांसाठी एम एच ११ इ डी नवीन मालिका सुरु जर्मनीतील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्र उभारावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी

पुणे-समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणीचे आयोजन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन सुनावणी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.     

सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून २९ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा सकाळी १० ते ११ या वेळेत, सांगली सकाळी ११.३० ते १२.३०, सोलापूर दुपारी १ ते २, कोल्हापूर दुपारी ३ ते सायंकाळी ४ आणि पुणे जिल्ह्यासाठी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत होईल. समितीचे सदस्य हे सुनावणी कामी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

या जनसुनावणीसाठी नागरिकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे.

या जनसुनावणीत हितसंबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे. ज्या नागरिकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मते नोंदवायची आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टल⁠ वर ३७ मुद्यांची माहिती देता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी पुणे-समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९ नोव्हेंबर

Live Cricket