Home » राज्य » शिक्षण » सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण तालुक्यात विविध उपक्रमांना गती

सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण तालुक्यात विविध उपक्रमांना गती

सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण तालुक्यात विविध उपक्रमांना गती

पाटण- सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण तालुक्यात प्रशासनाच्या वतीने विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी, सातारा तसेच तहसीलदार, पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी, दाखले वाटप, फेरफार नोंदी, मतदार नोंदणी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.

गुढे येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांना भूकंपग्रस्त दाखले, जात पडताळणी, रहिवासी दाखले, वारस दाखले तसेच Farmer ID यांचे वाटप करण्यात आले.तळमावळे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला. पोतेकरवाडी येथे वारसा फेरफार व 7/12 उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच याच ठिकाणी रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.

मंद्रूळ-कोळे येथे दिव्यांग बांधवांना वारसा फेरफार व 7/12 उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मतदान केंद्राला भेट देऊन मतदार नोंदणी अभियानाची पाहणी करण्यात आली. मतदार यादीची तपासणी करून पात्र नागरिकांची मतदार नोंदणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.पाणेरी येथे भटक्या-विमुक्त जातींसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नागरिकांना रेशन कार्ड, 7/12 उतारे, जात दाखले तसेच इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रशासन नागरिकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे. नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा व कागदपत्रे जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होऊन शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता पांचगणी प्रतिनिधी : सातारा जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित

Live Cricket