शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » ठळक बातम्या » सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहा; फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधा

सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहा; फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधा

सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहा; फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधा

​सातारा –आजच्या संगणकीय युगात अंतर्जालाद्वारे चालणारे बँकिंग, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस , सामाजिक माध्यमे आणि विविध डिजिटल सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या वाढत्या वापरासोबतच ऑनलाइन फसवणूक, बनावट दुवे (लिंक्स), एकवेळचा सांकेतांक(OTP) मागणे, बनावट ग्राहकाची ओळख पटवणारी प्रक्रिया (KYC), सामाजिक माध्यमांचे हॅकिंग आणि क्रेडिट व डेबिट कार्ड फसवणूक यांसारख्या सायबर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक वैभव जाधव यांनी केले आहे.

काशीळ तालुका कराड येथील श्रीराम गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंडळ, मोरया गणेश उत्सव मंडळ, विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ व योद्धा ग्रुप गणेशोत्सव मंडळ या मंडळांमध्ये लोकसंवाद-2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुदर्शन माने यांच्यासह मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

​सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार नोंदणी संकेतस्थळावर (www.cybercrime.gov.in) आपली तक्रार नोंदवावी. आर्थिक किंवा सायबर फसवणूक झाल्यानंतर जितक्या लवकर तक्रार नोंदवली जाते, तितक्या लवकर संबंधित व्यवहारावर किंवा खात्यांवर आवश्यक ती कायदेशीर व तांत्रिक कारवाई करून रक्कम सुरक्षित करण्याची शक्यता वाढते, असे जाधव यांनी सांगितले 

​नागरिकांनी सायबर सुरक्षेसाठी आपला एकवेळचा सांकेतांक (OTP), गुप्त कोड (PIN) किंवा बँक खात्याचा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नये. संदेश अथवा सामाजिक माध्यमांवर येणाऱ्या संशयास्पद व अनोळखी दुव्यांवर (लिंक्स) क्लिक करू नये. बँक अधिकारी, पोलीस किंवा सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्यांवर लगेच विश्वास ठेवू नये, कारण कोणतीही बँक दूरध्वनीवरून वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती मागत नाही. खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्यास तात्काळ आपल्या बँकेच्या अधिकृत क्रमांकावर किंवा शाखेत संपर्क साधून खाते ब्लॉक करावे. तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब १९३० या मोफत क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवावी असे आव्हान श्री. जाधव यांनी यावेळी केले. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket