सामाजिक कार्याची दखल; गोपाल बिरारी ‘राष्ट्रीय गौरव’, उदय निकम ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित पुण्यात पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा
पुणे प्रतिनिधी -दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी पुण्यातील पत्रकार भवन या ठिकाणी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय गौरव पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मान सोहळा वितरित करण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या सेवा कार्याचे तसेच त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अथक परिश्रमाचे श्रेय या पुरस्कारातून त्यांना प्रदान करण्यात आले.
शिक्षण कला सामाजिक अशा अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांसाठी एक निवड समितीच्या माध्यमातून आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनने हे पुरस्कारार्थींची निवड केली.त्यात विशेष करून प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी व फायर आणि सेफ्टी या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले उदयजी निकम यांची अनुक्रमे राष्ट्रीय गौरव पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आले श्री.गोपाल बिरारी यांचे पोलीस मित्र संघ व ग्राहक संरक्षण समिती भारत सरकार मान्य यांच्या माध्यमातून अनेक कार्यांमध्ये आपला सामाजिक ठसा उमटवत तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असलेले सीमेवरील जवान तसेच पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी गेली अनेक वर्ष श्री गोपाल बिरारी हे अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.
श्री.उदयजी निकम हे वीस वर्षांपासून फायर आणि सेफ्टी ट्रेनिंग तसेच इंडस्ट्रियल ऑडिट आणि त्यासोबतच सामाजिक कार्यामध्ये प्रांत पोलीस मित्र संघ रक्तदान शिबिरांचे आयोजन अशा अनेक सामाजिक कार्यातून आपण आपले कार्य करीत आलेले आहेत आणि याच कार्याची दखल म्हणून आनंदी युनिव्हर्स फौंडेशनच्या वतीने श्री गोपाल बिरारी यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार व श्री उदय निकम यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
मराठीतील सुप्रसिद्ध सिनेतारका अक्षता व आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश विटकर यांच्या शुभहस्ते पुण्यातील पत्रकार भवन या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारामुळे सामाजिक व सेवाभावी कार्याला प्रोत्साहन मिळत असून, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या योगदानाचा गौरव झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




